'पलक' अटकेत - ऋषी कपूर यांनी दिला राम रहिम यांना खुला चॅलेंज

Updated: Jan 14, 2016, 07:31 PM IST
 'पलक' अटकेत - ऋषी कपूर यांनी दिला राम रहिम यांना खुला चॅलेंज

पाहू या मला कोण अटक करत - ऋषी कपूर  

 मुंबई :  डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह यांची नक्कल करण्याच्या आरोप असलेल्या टीव्ही अभिनेता किकू शारदा (पलक) याच्या अटकेवर प्रतिक्रिया थांबत नाही आहे. 

 
 किकू शारदा याच्या समर्थनात अनेक कलाकार समोर आले आहेत.  त्यात आता ऋषी कपूर यांचेही नाव जोडले गेले आहे. त्यात सर्वप्रकारे किकू याचे समर्थन केले आहे. किकू शारदा यापुढेही राम रहीम यांची भूमिका निभावणार पाहू या कोण त्याला अटक करतं. ऋषी कपूर यांनी ट्विट करून खुलेआम चॅलेंज दिला आहे. 

  
 ऋषी कपूर यांनी किकूचे समर्थन करताना ट्विट केले की, मी एका चित्रपटात या रॉकस्टारची (डेरा प्रमुख) भूमिका करणार पाहू कोण मला अटक करतं. आगे बढो किकू शारदा.. 
 
 कपिल शर्मा, राजू श्रीवास्तवसह अनेक टीव्ही कलाकारांनी तसेच फराह खान, हुमा कुरैश आणि वीर दास यांनी किकूच्या अटकेबद्दल नाराजी व्यक्त केली.