मुंबई : बॉक्स ऑफिसवर जोरदार कल्ला करणाऱ्या सैराट सिनेमाने अनेक विक्रम मोडीत काढलेत. २५.२५ कोटींची दहा दिवसात घसघशीत कमाई केली. हा आकडा ५० कोटीपर्यंत जाण्याची शक्यता मिळत असलेल्या प्रतिसादामुळे व्यक्त होत आहे. यातील खरे हिरो लहानपणी कसे दिसत होते, याची एक झलक पाहायला मिळते. आर्ची आणि पारश्या यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सैराट या सिनेमाने मराठी सिनेमासृष्टीत नवीन इतिहास रचला आहे. तर झिंग झिंग झिंगाट गाण्याने तरुणाईला वेड करुन सोडलेय. तर या सिनेमातील नवोदित जोडी रिंकू अर्थात प्रेरणा राजगुरु आणि आकाश ठोसर हे तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. आता त्यांचे जुने फोटो व्हायरल होत आहेत. ते लहानपणी कसे दिसतात, याची प्रत्येकाला उत्सुकता असते.
रिंकू राजगुरु, नागराज मंजुळे, आकाश ठोसर यांच्या ऑफिशिअल आणि फॅन्स पेजवरुन त्यांच्यासंबंधीच्या नवनवीन गोष्टी पुढे येत आहेत. असाच एक फोटो हाती लागलाय. या फोटोमध्ये या कलाकारांना ओळखणेही जर कठीण असले तरी त्यांची ओळख लगेचच पटते.