प्रिती झिंटाच्या विवाह स्वागत समारंभाला सलमानची लुलियासोबत हजेरी

अभिनेता सलमान खान त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी बोहल्यावर चढणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, अभिनेत्री प्रिती झिंटा हिच्या लग्नाच्या स्वागत समारंभाला सलमान आणि लुलिया वेंतूर यांनी एकत्र हजेरी लावली. तसेच सल्लूने तिची अनेकांशी ओळख करुन दिली. त्यामुळे त्यांच्या लग्नाबाबत उत्सुकता लागून राहिलेय.

Updated: May 14, 2016, 10:55 AM IST
प्रिती झिंटाच्या विवाह स्वागत समारंभाला सलमानची लुलियासोबत हजेरी title=

मुंबई : अभिनेता सलमान खान त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी बोहल्यावर चढणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, अभिनेत्री प्रिती झिंटा हिच्या लग्नाच्या स्वागत समारंभाला सलमान आणि लुलिया वेंतूर यांनी एकत्र हजेरी लावली. तसेच सल्लूने तिची अनेकांशी ओळख करुन दिली. त्यामुळे त्यांच्या लग्नाबाबत उत्सुकता लागून राहिलेय.

 युवराज सिंगची गळाभेट 

प्रिती झिंटा हिच्या लग्नाच्या स्वागत समारंभाला मध्यरात्रीच्या सुमारास सुरूवातीला मर्सिडीज गाडीतून सलमान खान कार्यक्रमस्थळी आला. त्यापाठोपाठ लुलिया वेंतूरही तिच्या ऑडी गाडीतून पोहोचली. सलमानने गाडीतून उतरल्यानंतर प्रथम क्रिकेटपटू युवराज सिंगची गळाभेट घेतली. यादरम्यान लुलियादेखील तिच्या कारमधून बाहेर आली. तेव्हा सलमानने लुलियाची युवराज सिंगबरोबर ओळख करून दिली.

लुलियाचे मौन

सल्लू आणि लुलियाने एकत्र सुमारे दोन तास वेळ या स्वागत समारंभात घालवला. दरम्यान,  घरी जात असताना पत्रकारांनी लुलियाला सलमानसोबत लग्न करणार असल्याबद्दल प्रश्न विचारले. तेव्हा लुलियाने मौन बाळगणे पसंत केले.

 लुलियाची ओळख करुन दिली?

या कार्यक्रमात सलमान खानने शाहरूख खान आणि अभिषेक बच्चन यांच्यासह अनेकांशी लुलियाची ओळख करून देताना ती आपली जवळची मैत्रीण असल्याचे सांगितले. तर काही दिवसांपूर्वी पंजाबमधले ‘सुल्तान’चे चित्रीकरण आटपून सलमान आणि त्याची आई सलमा खान मुंबईत परतताना लुलिया त्यांच्याबरोबर होती. लुलिया सलमानच्या आईची यावेळी काळजी घेताना दिसत होती.