मुंबई : अभिनेता सलमान खान ५०चा झाला तरी लग्न कधी करणार असा प्रश्न नेहमी विचारला जायचा. मात्र, तो लग्न करण्यास राजी झालाय. सध्या त्याच्यासोबत सावली प्रमाणे असणारी लुलिया वेंतूर हिच्यासोबत तो लग्न करणार आहे म्हणे. त्यांच्या लग्नाची तारीखही ठरलेय.
लुलिया सलमानपेक्षा १५ वर्षांनी लहान आहे. सलमान आणि लुलियाच्या कुटुंबाला हा रिस्ता कबुल आहे. त्यामुळेच सलमान आपल्या ५१ व्या वाढदिवसानिमित्ताने म्हणजेच २७ डिसेंबरला तो बोहल्यावर चढणार आहे.
सुल्लान या सिनेमाचे शुटिंग संपलेय. तसेच सलमान दुसऱ्या कोणत्याही सिनेमाचे शुटिंगही करत नाही. त्यामुळे तो सुट्टीवर जाणार आहे. सुट्टीचे कारण म्हणजे त्याच्या लग्नाची तयारी असल्याचे सांगितले जात आहे.