सलमानच्या 'हिट अँड रन' प्रकरणाची सुनावणी अखेर 30 जुलैपासून

 सलमान खानच्या 'हिट अँड रन' प्रकरणी दोन महत्त्वाच्या बातम्या आहेत. एक सलमानसाठी दिलासादायक बातमी आहे. सुप्रीम कोर्टानं सलमानची याचिका रद्द करण्याबाबतची याचिका रद्द केलीय. 

Updated: Jul 27, 2015, 10:02 PM IST
सलमानच्या 'हिट अँड रन' प्रकरणाची सुनावणी अखेर 30 जुलैपासून title=

मुंबई: सलमान खानच्या 'हिट अँड रन' प्रकरणी दोन महत्त्वाच्या बातम्या आहेत. एक सलमानसाठी दिलासादायक बातमी आहे. सुप्रीम कोर्टानं सलमानची याचिका रद्द करण्याबाबतची याचिका रद्द केलीय. 

सलमानची याचिका रद्द विरुद्धची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली

1993 मुंबई बॉम्बस्फोटाचा दोषी याकूब मेमनचा बचाव करण्याबाबतचं ट्विट सलमाननं केलं होतं. त्याच्याविरोधात भाजपनं 2002 'हिट अँड रन' प्रकरणात सलमानला मुंबई सेशन्स कोर्टानं शिक्षा सुनावलीय. त्याची हायकोर्टातील याचिका रद्द करावी, अशी याचिका मुंबई भाजपनं केली होती. ही याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलीय.

सलमानच्या 'हिट अँड रन' प्रकरणाची सुनावणी अखेर 30 जुलैपासून

तर सलमान खानच्या 'हिट अँड रन' प्रकरणाच्या सुनावणीसाठी तारीख  अखेर निश्चित करण्यात आलीय. मुंबई हायकोर्टात 30 जुलै रोजी सुनावणी होईल.
 
हिट अँड रन प्रकरणात 8 मे रोजी सलमान खानला जामीन मिळाला, मात्र त्यानंतर सुनावणीची तारीख वारंवार पुढं ढकलण्यात आली. पण आता मुंबई हायकोर्टानं या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 30 जुलै ही तारीख निश्चित केली आहे.
 
सलमान खानला हिट अँड रन प्रकरणात 6 मे रोजी 13 वर्षांनंतर शिक्षा सुनावण्यात आली होती. या प्रकरणात सलमानला दोषी ठरवत त्याच्यावर सदोष मनुष्यवधाच्या कलमांतर्गत पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.