इस्लामाबाद : सलमान खानला २००२ साली झालेल्या 'हिट अॅण्ड रन' प्रकरणी पाच वर्षाची शिक्षा देण्यात आली आहे.
फक्त भारतातच नाही तर पाकिस्तानातही हा ट्रेंड आघाडीवर दिसून येत आहे.पाकिस्तानात #salmanverdict हा ट्रेंड सर्वात वर आहे.
पाकिस्तानातील काही युझर्सच्या मते कोर्टाच्या निर्णयानंतर ते उदास झाले आहेत, मात्र दुसऱ्यांच्या मते हा मानवतेचा विजय आहे.
जर सलमान दोषी आहे, तर त्याला शिक्षा मिळाली पाहिजे, मात्र मी सलमानसाठी नाराज आहे. तर एका पाकिस्तानी फॅनने याला 'दुखद ख़बर' म्हटलं आहे.
पाकिस्तानच्या समा टीवीचे पत्रकार नदीम मालिक म्हणतात, सलमान खान भाग्यशाली आहे कारण, अशा कठीण समयी त्याचे वडील त्याच्या सोबत आहेत.
गायिका फीफा हारुनने या निर्णयावर दु:ख व्यक्त केलं आहे, पण म्हटलंय की न्याय मिळणे सर्वात महत्वाचं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.