मुंबई : बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ... हा फिल्मी डायलॉग कुणाला फिट्ट बसत असेल तर तो आहे सलमान काँट्रोवर्सी खानला... तो केवळ पडद्यावरच दबंग नाही... तर प्रत्यक्ष वैयक्तिक जीवनातही आहे... कसा? पाहूयात हा खास रिपोर्ट...
पाहा कसा आहे सलमान 'कॉन्ट्रोवर्सी' खान
सलमान खान नावाचा हा चुलबुल पांडे... करोडो रसिकांच्या हृदयावर राज्य करणारा आणि प्रत्येक सिनेमातून 100-100 कोटींची कमाई करणारा सुपरस्टार... मात्र सिनेस्टार म्हणून तो जेवढा फेमस, तेवढाच बदनाम देखील आहे.
कॉन्ट्रोवर्सी नंबर 1
2002 सालच्या हिट अँड रन प्रकरणी सलमान खानला हायकोर्टानं आता निर्दोष ठरवलंय. मात्र याच प्रकरणात सेशन्स कोर्टानं आधी त्याला दोषी ठरवलं होतं. दबंग खानच्या करिअरवरील डाग आता पुसला गेलाय...
कॉन्ट्रोवर्सी नंबर 2
1999 मध्ये हम साथ साथ है गाणं गात, सलमान खान आणि त्याच्या सह कलावंतांनी चिंकारा आणि काळवीट जातीच्या हरणाची शिकार केल्याचा आरोप आहे. त्या प्रकरणाची सुनावणी कोर्टात सुरूय...
कॉन्ट्रोवर्सी नंबर 3
अलिकडेच याकूब मेमनला फाशीची शिक्षा होत असताना, दारूच्या नशेत सलमानने वादग्रस्त ट्वीट्स केले होते. त्यावेळी त्यानं याकूबची पाठराखण केली होती. मात्र वादानंतर, या बजरंगी भाईजाननं ते ट्वीट्स डिलीट केले.
कॉन्ट्रोवर्सी नंबर 4
सलमानची फिल्मी हिरॉईन्ससोबतची अफेअर्स देखील वादग्रस्त ठरली. संगीता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय, ऐश्वर्यासारखीच दिसणारी स्नेहा उल्लाळ, कतरिना कैफ, जर्मन मॉडेल क्लॉडिया सिसला, झरीन खान, महेक चहल, हेझल कीच, लुलिया वंतूर ही यादी अजून संपलेली नाही... आणि अजूनही तो मोस्ट इलिजिबल बॅचलर आहे, हे वेगळं...
कॉन्ट्रोवर्सी नंबर 5
2003 मध्ये दारूच्या नशेत ऐश्वर्या रायच्या घरी जाऊन त्यानं धिंगाणा घातला. त्यावेळी तिचा बॉयफ्रेंड विवेक ओबेरॉयशी त्याचा पंगा झाला होता.
कॉन्ट्रोवर्सी नंबर 6
2014 मध्ये नरेंद्र मोदींसोबत गुजरातच्या काइट फेस्टिव्हलमध्ये सलमान हजर राहिल्यानं अनेकांना धक्का बसला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत तो माहीमच्या कोळी महोत्सवातही दिसला. राजकीय कनेक्शनमुळं तो नेहमीच चर्चेत राहिला.
कॉन्ट्रोवर्सी नंबर 7
2008 मध्ये कतरिना कैफच्या बर्थडे पार्टीत सलमान खान आणि शाहरूख खान एकमेकांना भिडले. करन आणि अर्जुनमध्ये निर्माण झालेली ही दुरी मिटली ती अर्पिता खानच्या लग्नात... त्याआधी एका रोझा पार्टीतही करन अर्जुनची गळाभेट झाली होती.
कॉन्ट्रोवर्सी नंबर 8
सलमानच्या घरी गणेशोत्सव साजरा केला जातो, म्हणूनही वाद झाला होता. मुस्लिम संघटनांनी फतवा काढून सलमानवर टीका केली होती.
कॉन्ट्रोवर्सी नंबर 9
2014 मध्ये उत्तर प्रदेश सरकारच्या सैफई महोत्सवात सलमानच्या सहभागावरून वाद निर्माण झाला. मुझफ्फराबाद दंगल पीडित उपाशीपोटी असताना, फिल्मी तारे नाचगाण्यात दंग असल्याची टीका त्यावेळी झाली.
कॉन्ट्रोवर्सी नंबर 10
बिग बॉस टीव्ही सिरीयलचं अँकरिंग करणारा सलमान स्वतःच बिग बॉससारखा वागत असल्याचेही आरोप झाले. शोमध्ये कोण राहणार आणि कुणाला आऊट करायचं, ते सलमानच ठरवतो, असे आरोप अनेकांनी केले. सलमान आणि कॉन्ट्रोवर्सी हे समीकरण कधी संपेल का, हा प्रश्नच आहे...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.