स्वराचा अतरंगी फॅन... पत्रात गुंडाळून धाडलं मंगळसूत्र-टिकली!

एखाद्या सिने अभिनेत्री / अभिनेत्याचे फॅन्स कोणत्या थराला जाऊ शकतात की त्याचा कधी कुणी विचारही केला नसेल... असाच काहीसा अनुभव 'रांझना' फेम अभिनेत्री स्वरा भास्कर हिला येतोय.

Updated: Mar 3, 2016, 11:59 AM IST
स्वराचा अतरंगी फॅन... पत्रात गुंडाळून धाडलं मंगळसूत्र-टिकली! title=

मुंबई : एखाद्या सिने अभिनेत्री / अभिनेत्याचे फॅन्स कोणत्या थराला जाऊ शकतात की त्याचा कधी कुणी विचारही केला नसेल... असाच काहीसा अनुभव 'रांझना' फेम अभिनेत्री स्वरा भास्कर हिला येतोय.

स्वरा हिच्या एका अतरंगी फॅननं तिला चक्क एका पत्रासोबत मंगळसूत्र आणि टिकली पाठवलीय. 

swara fan
स्वराला आलेलं पत्र

स्वरा सध्या दूरदर्शनवर दिसणाऱ्या रंगोली या कार्यक्रमातही दिसतेय. या कार्यक्रमाचं होस्टिंग करताना तीनं अनेकांची मनं जिंकलीत. याच कार्यक्रमासाठी आणि स्वरासाठी दिवसाला दूरदर्शनला अनेक पत्र, ईमेल आणि मॅसेज येत असतात.

असंच एक पत्र आलं आणि सगळ्यांना हसावं की आणखी काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळेनासं झालं... कारण, या पत्रासोबत एक मंगळसूत्र आणि टिकलीही होती. या पत्रात एका महाशयानं स्वराला तिच्या कार्यक्रमात मंगळसूत्र वापरून आपण स्वरा भास्करचा पती असल्याचा दावा केलाय. दीपक कुमार असं या महाशयांचं नाव असल्याचं पत्रावरून दिसतंय.

यावर, प्रतिक्रिया देताना स्वरानं आपण ही गोष्ट काही फारशी सिरियसली घेतली नसल्याचं म्हटलंय.