'वेटिंग'चा ट्रेलर रिलीज

नसीरुद्दीन शाह आणि कल्की कोचलिनच्या वेटिंग चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

Updated: Apr 24, 2016, 06:52 PM IST
'वेटिंग'चा ट्रेलर रिलीज

मुंबई: नसीरुद्दीन शाह आणि कल्की कोचलिनच्या वेटिंग चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाची कहाणी अशा दोन लोकांबद्दल आहे, ज्यांचे जीवनसाथी कोमामध्ये आहेत. 

नसीरुद्दीन शहा हॉस्पिटलमध्ये असलेल्या आपल्या बायकोला भेटायला जातात. याच हॉस्पिटलमध्ये कल्कीचा पतीही असतो. तिकडेच कल्की आणि नसीरुद्दीन शहांची ओळख होते. ओळखीचं रुपांतर मैत्रीत होतं, याभोवती या चित्रपटाची कथा फिरते. 27 मे ला हा चित्रपट रिलीज होणार आहे. 

पाहा वेटिंगचा ट्रेलर