मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने असं काही केलं की सर्वजण चकीत झालेत. लोकांचे सोडा खुद्द अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनीही असा काही विचार स्वप्नातही केला नसेल. ऐश्वर्याने स्टेजवर असं केलं की सर्वांना धक्का बसला.
स्टारडस्ट पुरस्काराच्यावेळी ऐश्वर्या राय बच्चनला सिनेमा 'जज्बा' तील कमबॅकबद्दल विशेष पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार अभिनेत्री रेखा हिच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावर सर्व काही ठिक होतं. मात्र, ऐश्वर्याने सर्वांना एक धक्का दिला. ज्यावेळी रेखाला तिने आई (मॉं) म्हणून हाक मारली.
ऐश्वर्याने पुरस्कार स्वीकारल्यानंतर म्हणाली, आईच्या हाताने पुरस्कार मिळणे ही मोठी गोष्ट आहे. त्यानंतर रेखा म्हणाली, मला आशा आहे की, यापुढेही मी पुरस्कार देण्यासाठी पुढे येईन.
ज्यावेळी रेखा आणि ऐश्वर्या यांचे बोलणे सुरु होते त्यावेळी बिग बी अमिताभ बच्चन ऑडिशनमध्ये बसलेले होते. रेखा सोबत बच्चन कुटुंबीयांचे कसे नाते आहे, हे आपण सर्वजण जाणता. ऐश्वर्य़ाने रेखाला आई म्हटले. मात्र, ते जया बच्चन यांना आवडले नसेल. मात्र, ती त्यांची जुनी जखम आहे.