मुंबई : बाजीराव मस्तानीने जेव्हा दिलवालेवर कमाईच्या बाबतीत कुरघोडी केली तेव्हा सगळ्याच सिनेमा चाहत्यांच्या मनात हा प्रश्न आला असेल की कोण सर्वात जास्त कमाई करेल.
शाहरुख खानचा दिलवाले सुरुवातीला जरी चांगली कमाई करत होता पण बाजीराव मस्तानी कासवाच्या गतीने का होईना पण पुढे निघून जातांना दिसत आहे.
दिलवालेने देशात आणि विदेशातही १०० कोटी पेक्षाही अधिक कमाई केली. दिलवाले १० दिवसात जवळपास २७० कोटींची कमाई केली आहे.
बाजीराव मस्तानीनेही १० दिवसात २०० कोटी पेक्षाही अधिक कमाई केली आहे. बाजीराव मस्तानीची चांगली कमाई अजूनही चालूच आहे. १० व्या दिवशी त्यांनी १२ कोटींची कमाई केली.
१० दिवशी मोठी कमाई करणारे सिनेमे रेकॉर्ड करतात असं म्हटलं जातं. बाजीराव मस्तानीही त्याचं मार्गावर असतानांचं दिसत आहे. नवी वर्षात बाजीराव हा किंग खानला मागे सोडेल असं भाकित वर्तवलं जातंय.
येत्या आठवड्यात दिलवाले हा १६० कोटींची अजून कमाई करेल पण बाजीराव मस्तानी मात्र पुढे निघून जाईल. तो अजून २०० कोटींची कमाई करेल असं भाकित सिने पंडितांनी केलं आहे.