मुंबई : सुपरस्टार किडसना बॉलिवूडमध्ये काम करताना कोणत्याही समस्यांना सामोरं जावं लागत नाही किंवा त्यांना सगळं काही खूप सहज मिळतं असा जर तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे, असं म्हणणं आहे अभिषेक बच्चनचं...
एका वेबसाईटशी बोलताना... अभिषेकनं आपल्या बॉलिवूड करिअरमधल्या चढ-उतारांना अधोरेखित केलंय. जेव्हा तुम्ही सलग फ्लॉप सिनेमे देतात... तेव्हा लोक तुमचा फोनही उचलणं बंद करतात. मग, यावेळी हे पाहिलं जात नाही की तुम्ही कुणाची मुलं आहात? असं अभिषेकनं म्हटलंय.
पण, आपल्या वाईट प्रसंग किंवा अयशस्वी अनुभव मागे टाकत भविष्याबाबत सकारात्मक राहण्याचा सल्ला अभिषेक देतोय. एखादा सिनेमा बनवण्यासाठी खूप मोठी रक्कम गुंतवली जाते. कोणत्याही अभिनेत्याला असं वाटतं नाही की त्याचा सिनेमा फ्लॉप व्हावा... आम्ही पूर्ण झोकून देऊन काम करतो पण, नंतर सांगितलं जातं की हा सिनेमा तितका चांगला चालला नाही... ही गोष्ट आम्हाला संपवण्यासाठी पुरेशी असते, असंही तो म्हणतोय.
पण, एक सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर पुन्हा एकदा सज्ज होणं हे आमच्यासाठी चॅलेंज असतं... कोणत्याही व्यक्तीला एक नवीन ताकद हवी असते ज्यामुळे तो प्रत्येक सकाळी उठून जगाचा सामना करू शकेल.
अभिषेकचा 'ऑल इज वेल' हा सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर दाखल होतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.