बिग बॉस ८ च्या सेटचे काम बंद, ५० लाख मजुरी देणे बाकी

बिग बॉस ८च्या सेटचे काम बंद करण्यात आले आहे. द फिल्म स्टुडिओ सेटिंग आणि मजदूर युनियनने प्रोडक्शन हाऊस इंडेमॉल विरोधात नॉन कॉ-ऑपरेशन नोटीस पाठवली आहे. 

Updated: Aug 26, 2014, 03:49 PM IST
बिग बॉस ८ च्या सेटचे काम बंद, ५० लाख मजुरी देणे बाकी title=

मुंबई  : बिग बॉस ८च्या सेटचे काम बंद करण्यात आले आहे. द फिल्म स्टुडिओ सेटिंग आणि मजदूर युनियनने प्रोडक्शन हाऊस इंडेमॉल विरोधात नॉन कॉ-ऑपरेशन नोटीस पाठवली आहे. 

मिड-डे डॉट कॉम मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार मजदूर युनियनचे महासचिव गंगेश्वर श्रीवास्तवने सांगितले की, इंडेमॉलला आम्हांला ५० लाख रुपये द्यायचे आहे. गेल्या दोन वर्षांपासून जी कामे आमच्या कामगारांनी त्यांच्यासाठी केली आहेत. त्याचे हे पैसे आहेत. 

या बातमी करण्यात आलेल्या आरोपांनुसार कामगार संघटनेतील एक वर्कर रमेश मौर्या याचे बिग बॉसच्या सेटवर हृदयविकाराने मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबियांना १० लाखांची नुकसान भरपाई मिळाली नाही.  
श्रीवास्तव यांनी सांगितले की, आणखी एक शो एन्काउंटरसाठी केलेल्या कामाचेही पैसे आतापर्यंत देण्यात आलेले नाही. पैसे मिळत नाही म्हणून सदस्यांनी काम करणे बंद केले आहे. पैसे मिळत नाही तोपर्यंत ते काम सुरू करणार नाही. 

मिड डे ने इंडेमॉलचे सीईओ दीपक धर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणतेही उत्तर आले नाही. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.