मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राजकीय कारणासाठी कधीच फोन केला नाही, त्यांनी फक्त प्रकृतीच्या कारणासाठी त्यांनी राज ठाकरे यांना फोन केला असल्याचा दावा युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
चांदिवलीत शिवसेनेचे उमेदवार संतोष आर एन सिंह यांच्या प्रचारासाठी असलेल्या रॅलीत आदित्य बोलत होते.
मुलुंडच्या सभेत राज ठाकरेंनी शिवसेना-मनसे युतीसाठी उद्धव ठाकरेंनी फोन केल्याचा गौप्यस्फोट केला होता. मात्र उद्धव यांनी त्यानंतर प्रतिसाद न दिल्याने ही युती होऊ शकली नसल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. मी सर्व ते प्रयत्न केले, पण दोन माणसं आले की एखादा निर्णय, तीन माणसे आले की दुसरा निर्णय.... आपलं तसं नसतं... आतला आवाज आला की आपण तोच निर्णय घेतला, असे राज ठाकरे म्हटले होते.
राज ठाकरे आजारी होते, म्हणून उद्धव ठाकरेंनी फक्त प्रकृतीची विचारपूस करण्यासाठीच फोन केल्याचं सांगत आदित्य ठाकरेंनीराज ठाकरेंचे सर्व आरोप फेटाळूले आहेत.
आता शिवसेनेची हवा आहे, त्यामुळे शिवसेना स्वबळावर सत्ता स्थापन करेल, असा विश्वासही आदित्य ठाकरे याने व्यक्त केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.