मुंबई : प्रचार संपायला एक दिवस शिल्लक असताना राज्यभर पैशाचा पाऊस पडलाय. शिरुरमध्ये पाच लाख, नाशिकमध्ये १२ लाख तर रामटेकमध्ये १० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
मुंबईत पवई परिसरात जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर 18 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. निवडणूक भरारी पथकानं ही कारवाई केलीय. ही रक्कम राष्ट्रवादीचे भांडुपचे उमेदवार एल. बी. सिंग यांच्यासाठी जात असल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
निवडणुकीचा प्रचार संपायला दोन दिवस शिल्लक असताना राज्यात पैशाचा पाऊस पडतोय. पुणे जिल्ह्यातल्या शिरुरमध्ये पाच लाख रुपये सापडलेत. तर नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमध्ये पाच लाख आणि सटाण्यात ७ लाख पकडलेत. वर्ध्यामध्ये पाच लाखांची रोकड. तर सांगलीमध्येही पाच लाखांची रक्कम पकडण्यात आलीय. नागपूरमध्ये राहुल गांधींच्या सभेच्या पूर्वीसंध्येला १० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
मुंबईतील वरळी कोळीवाड्यात सुधाकर घागरे यांच्या घरी टाकलेल्या धाडीत दोन ट्रक भरुन फ्राय पॅन जप्त करण्यात आलेत.. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन अहिर आणि त्यांच्या पत्नी संगीता अहिर उपस्थित होत्या असा आरोप होतोय. सुधाकर घागरे हे ना.म.जोशी मार्गाचे माजी सिनीयर पीआय असून अहिर यांनी त्यांची कोळीवाड्यातील प्रचारप्रमुख म्हणून नियुक्ती केल्याचं बोललं जात आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.