सून असावी तर अशी, प्रियंका चोप्राच्या 'त्या' गोष्टीने वेधलं सर्वांचं लक्ष, सर्वत्र होतंय कौतुक

प्रियंका चोप्रा सध्या तिच्चा भावाच्या लग्नामुळे चर्चेत आहे. नुकतीच ती संगीत समारंभात सासू आणि सासऱ्यांसोबत दिसली. याचाच व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. 

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 6, 2025, 02:49 PM IST
सून असावी तर अशी, प्रियंका चोप्राच्या 'त्या' गोष्टीने वेधलं सर्वांचं लक्ष, सर्वत्र होतंय कौतुक title=

Priyanka Chopra : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. प्रियंका चोप्रा सध्या भारतात आहे. तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या लग्नाच्या विधींना ती उपस्थित आहे. प्रियंका चोप्राचे भावाच्या लग्नातील फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. अभिनेत्री तिच्या संस्कृतीशी खूप जोडलेली आहे. भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या लग्नापूर्वीच्या सेलिब्रेशनमध्ये प्रियंका चोप्रा एका आकर्षक स्ट्रॅपलेस गाऊनमध्ये आली होती. यावेळी तिच्यासोबत तिचे सासू आणि सासरे देखील उपस्थित होते. त्याच वेळी अभिनेत्रीच्या एका कृतीने तेथील असणाऱ्या सर्वांचे मन जिंकले.

दरम्यान, प्रियंका चोप्राचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती कार्यक्रमात पोहोचली तेव्हा तिने पापाराझींसाठी एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या. यावेळी तिच्यासोबत तिचे सासू आणि सासरे देखील होते. निक जोनास या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी आला नव्हता. पण प्रियंकाचे सासरचे लोक लग्नाला उपस्थित राहण्यासाठी आले आहेत. प्रियंकाची सासू डेनिस जोनास गुलाबी रंगाच्या साडीत दिसली. केविन जोनास सीनियर देखील भारतीय पोशाखात दिसले.

प्रियंकाच्या त्या गोष्टीने वेधलं सर्वांचं लक्ष

यावेळी पापाराझींसाठी पोज देताना प्रियंका तिच्या सासूची साडी व्यवस्थित करताना देखील दिसली. चाहत्यांना अभिनेत्रीची ही गोष्ट खूप आवडली.प्रियंकाच्या पोशाखाबद्दल बोलायचे झाले तर तिने पांढऱ्या रंगाचा स्ट्रॅपलेस गाऊन परिधान केला होता. तिच्या गाऊनवर रंगीबेरंगी फुले आणि पानांचे डिझाइन दिसत होते. याशिवाय तिने गळ्यात एक सुंदर नेकपीसही घातला होता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

तसेच तिने हातात ब्रेसलेट आणि दोन अंगठ्या घालून तिचा हा लूक पूर्ण केला होता. प्रियंकाचा हा लूक तिच्या भावाच्या संगीतासाठी होता. अभिनेत्री तिच्या भावाच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेत आहे. यासोबतच अभिनेत्री तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर करत आहे. प्रियंका तिच्या प्रत्येक लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.