1:47 PM - आर्णीत सेनेचे संदीप दुर्वे विजयी, माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघेंचा पराभव.. दुर्वे नवा चेहरा
1:26 PM - अकोला पूर्वमधून भाजपचे उमेदवार रणधीर सावरकर विजयी, भारिपच्या हरिदास भदे यांचा २५५० मतांनी केला पराभव... भदे दोन टर्मचे आमदार... रणधीर सावरकर पहिल्यांदाच विजयी
1:11 PM - यवतमाळ - मदन येरावार विजयी, माणिकरावांचा मुलगा राहुल ठाकरेचं डिपॉझिट जप्त
1:08 PM - सुनील केदार काँग्रेसचा उमेदवार विजयी, नागपूरातील काँग्रेसचा पहिला विजय, शिवसेनेच्या विनोद जिवतोडेचा पराभव, भाजपचा उमेदवार नव्हता, भाजप उमेदवार सोनबा मुसळेचा फॉर्म झाला होता रिजेक्ट
12:37 PM - विदर्भात ६२ पैकी अधिकाधिक जागांवर भाजपची सत्ता...
12:37 PM - अचलपूरहून बच्चू कडू (प्रहार) १० हजार मतांनी विजयी, हॅट्रिक पूर्ण
12:28 PM - भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस ४८०४६ मतांनी विजयी
रिसोड - काँग्रेसचे अमित झनक १७३५२ मतांनी विजयी
12:06 PM - राळेगावहून माजी मंत्री वसंत पुरकेंचा पराभव, भाजपचे अशोक उइके ३९ हजार मतांनी विजयी
11:58 AM - अमरावतीहून भाजपचे डॉ. सुनील देशमुख विजयाच्या उंबरठ्यावर
बडनेराहून अपक्ष आमदार रवी राणा आणि मोर्शीहून डॉ. अनिल बोंडे यांची विजयाकडे वाटचाल
11:38 AM -दिग्रस शिवसेना संजय राठोड विजयी
पुसद राष्ट्रवादी मनोहर नाईक विजयी
11:31 AM - मेहकरहून शिवसेनेचे डॉ. संजय रायमुलकर ३७१५८ मतांनी विजयी
10:43 AM - हिंगणघाटमधून भाजपचे समीर कुणावार आघाडीवर सध्याचे आमदार शिवसेनेचे अशोक शिंदे पिछाडीवर
10:36 AM - सहाव्या फेरीनंतर नागपूर मध्यमध्ये किशोर गजभिये (बसप) आघाडीवर
10:19 AM - मेहकरहून शिवसेनेचे डॉ. संजय रायमुलकर २२५७९ आघाडीवर, विजय निश्चित
10:12 AM - देवेंद्र फणडणीस ३१ हजार मतांनी आघाडीवर
9:55 AM - अकोल्यात सध्या भाजप २, भारिप ३ ठिकाणी आघाडीवर
9:29 AM - वरोरा संजय देवतळे तिसऱ्या स्थानावर... ९०६ मतांनी पिछाडीवर
9:20 AM - काकाला मागे टाकत आशिष देशमुख आघाडीवर
9:14 AM - काँग्रेसचे वसंत पुरके पिछाडीवर..
अकोला पश्चिममध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर
राळेगाव मतदारसंघातून अशोक उइके आघाडीवर
9:11 AM - अमरावतीहून रावसाहेब शेखावत पिछाडीवर, शेखावत प्रतिभाताई पाटील यांचा मुलगा
9:08AM - सुधीर मुनगंटीवार ४२४७ मतांनी आघाडीवर
9:00AM - माजी मंत्री नितीन राऊत पिछाडीवर
मलकापूरमध्ये भाजपचे संचेती ८०० मतांनी आघाडीवर
8:46AM - देवळी मतदारसंघातून भाजपचे सुरेश वाघमारे ४०० मतांनी आघाडीवर, पहिली फेरी
8:42AM - कामठीहून राजेंद्र मुळक ११०० मतांनी पिछाडीवर, भाजप पुढे
आर्वी मतदारसंघातून भाजपचे दादाराव कचे १६१ मतांनी आघाडीवर, पोस्टल मतदान
8:37AM - रिसोडहून काँग्रेसचे अमित झनक १४६३ मतांनी आघाडीवर
8:36AM - जळगाव जामोदहून भाजपचे संजय कुटे १७०० मतांनी तर मेहकरहून शिवसेनेचे संजय रायामुलकर आघाडीवर
8:32AM - यवतमाळ मतदारसंघातून शिवसेनेचे संतोष ढवळे आघाडीवर... माणिकराव ठाकरेंचा मुलगा राहुल ठाकरे पिछाडीवर..
8:20AM - भाजपचे देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण-पश्चिम ५००० मतांनी मतदारसंघातून आघाडीवर
8:17AM - विदर्भात सहा जागांवर भाजप आघाडीवर
8:11AM - अकोला पश्चिम भाजपचे गोवर्धन शर्मा आघाडीवर...
8:07AM - सावनेरला भाजपचे गिरीश महाजन आघाडीवर...
8:02AM - पोस्टल मतमोजणीनं सुरूवात... विदर्भात सर्वच मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी सुरू...
नागपूर: दिवाळीपूर्वीच नागपूरसह संपूर्ण विदर्भात दिवाळी साजरी करण्याची तयारी सुरू आहे. मतमोजणीला सुरूवात झालीय.
नितीन गडकरी, देवेंद्र फडणीस आणि संघ मुख्यालयासह नागपूर आणि विदर्भ भाजपचा गड मानला जातोय. आजच्या निकालामध्ये विदर्भातील आकडेवारी खूप महत्त्वाची ठरणार आहे.
विदर्भात ६२ मतदार संघ आहेत. पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भ... देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, राहुल ठाकरेंसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.
सर्वच एक्झिट पोलनं भाजपला सर्वात मोठा पक्ष दाखवलंय. त्यामुळं यंदा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद विदर्भाकडे येण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.