नेतेही झाले ‘टेक्नोसॅव्ही’; पंकजाचं ‘टेलिफोनिक’ भाषण

सध्याच्या तरुणांसोबत राजकारणातील नेतेही टेक्नोसॅव्ही झालेत. त्याचंच एक उदाहरण नुकतंच पाहायला मिळालं ते साताऱ्यात... 

Updated: Oct 10, 2014, 08:48 PM IST
नेतेही झाले ‘टेक्नोसॅव्ही’; पंकजाचं ‘टेलिफोनिक’ भाषण title=

सातारा : सध्याच्या तरुणांसोबत राजकारणातील नेतेही टेक्नोसॅव्ही झालेत. त्याचंच एक उदाहरण नुकतंच पाहायला मिळालं ते साताऱ्यात... 

त्याचं झालं असं की, भाजपच्या नेत्या आणि परळी विधानसभा मतदारसंघाच्या पक्षाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांची गुरुवारी साताऱ्यात एक सभा आयोजित करण्यात आली होती. पण, खराब वातावरण असल्यामुळे पंकजा यांच्या हेलिकॉप्टरला टेक ऑफची परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे, त्यांना सभेला जाता आलं नाही. 

पण... पंकजा मुंडे यांनी सभास्थळी न जाताही मतदारांशी संवाद साधला... त्यांनी सभास्थळी उपस्थित असलेल्या महादेव जानकर यांना फोन लावला... जावडेकरांनी हा फोन माईकवर धरला आणि लाऊडस्पीकरद्वारे पंकजा मुंडे यांचा आवाज मतदारांपर्यंत पोहचवला.  

सध्याच्या तरुणाईला वेड लागलंय ते ‘टेक्नोलॉजी’चं असं म्हटलं जातं... पण, याच आधुनिक टेक्नॉलॉजिच्या साहाय्यानं नेत्यांना आपल्या जनतेपर्यंत आपला संदेश पोहचवणंही सोप्पं जातंय. यामध्ये सध्या फेसबूक आणि ट्टविटरसारख्या सोशल साईटसही मागे नाहीत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.