माता-बहिणींचा अपमान करणारा हा गृहमंत्री - राज ठाकरे

मनसेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये आज राज ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी, 'त्यांनी बलात्कार करायचा होता तर निवडणुकीनंतर करायचा...' या वक्तव्यावरून त्यांनी आर आर पाटलांचा चांगलाच समाचार घेतला... तसंच, बलात्काराचा आरोप असणारे मनसेचे तासगाव कवठे महाकाळचे उमेदवार सुधाकर खाडे यांची पाठराखण राज ठाकरेंनी यावेळी केली.   

Updated: Oct 11, 2014, 09:24 PM IST
माता-बहिणींचा अपमान करणारा हा गृहमंत्री - राज ठाकरे title=

नाशिक : मनसेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये आज राज ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी, 'त्यांनी बलात्कार करायचा होता तर निवडणुकीनंतर करायचा...' या वक्तव्यावरून त्यांनी आर आर पाटलांचा चांगलाच समाचार घेतला... तसंच, बलात्काराचा आरोप असणारे मनसेचे तासगाव कवठे महाकाळचे उमेदवार सुधाकर खाडे यांची पाठराखण राज ठाकरेंनी यावेळी केली.   

'आमचे उमेदवार सुधाकर खाडे... याच आर आर पाटलांनी बलात्काराचा गुन्हा टाकला होता. कोर्टात खाडे निर्दोष सुटले... कोर्टानं खोटे आरोप करणाऱ्यांवर ताशेरे ओढळे होते... कोर्टानं निर्दोष सोडल्यानंतर पुन्हा केस टाकली... बलात्काराचे गुन्हे टाकण्याचा छंद आहे का?' असं म्हणत त्यांनी आबांना टोला हाणला... 'प्रचाराला बाहेर पडू नये म्हणू सुधाकर खाडे यांच्या पत्नीवर अॅट्रॉसिटीची केस टाकली... हे सगळं कशासाठी... तर, एक गोष्ट निश्चित, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची यांना भीती वाटतेय...' असं म्हणत त्यांनी खाडे यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. 

सोबतच, 'छाती नाही, उंची नाही तरी हे महाराष्ट्राचे गृहमंत्री... महाराष्ट्रातील माता-बहिणींचा अपमान करणारा गृहमंत्री... तुम्ही काय या महाराष्ट्रावर कमी बलात्कार केला का? या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्तेचा माज आलाय... निवडणुकीत राष्ट्रवादीला गाडावंच लागेल' असं म्हणत राष्ट्रवादी नेत्यांवर टीका करण्याची संधी त्यांनी सोडली नाही. 

'कामाचा हिशोब पाच वर्षांनीच विचारा...'
'मला विचारतायत नाशिकमध्ये काय केलं... माझ्या हातात सत्ता दिल्यानंतर पाच वर्षांनीच मला विचारा... काय केलं?' असं म्हणत राज्यकर्त्यांना जाब विचारण्याचा नागरिकांचा हक्कही त्यांनी उडवू लावला. 

'राज्यकर्त्यांचं 'इंच इंच विकू' सुरू आहे... मी बाकिच्यांसारखा नाही... टेंडरमधून पैसे काढायला नाही आलो... नाशिककरांना जो शब्द दिलाय तो पाळल्याशिवाय राहणार नाही... भाजप होतं माझ्यासोबत अडीच वर्ष... त्यांना नाही प्रश्न विचारले... नाशिकमध्ये भाजपवाले लाडात आले... मग, पदं न देता राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला...' असं म्हणत नाशिकच्या महापालिकेचं राजकारण त्यांनी जनतेसमोर मांडलं... 

'... तर सत्तेवर लाथ मारीन'
'नाशिकला सात महिने झाले आयुक्तच नाहीत... राज्याची वाट लावणाऱ्यांना का विचारत नाही? हे सगळं ठरवून चाललंय... पण, लाचार व्हायची वेळ आली तर लाथ मारीन सत्तेवर...' असंही राज ठाकरेंनी यावेळी म्हटलंय. 

'रोजगाराशिवाय तरुणांना काहीच दिसत नाही'
'आपल्याला नाशिकची ओळख गार्डन्सचं शहर म्हणून उभी करायचीय, असंही त्यांनी बोलून दाखवलं... मनसेचे व्हिडिओ पाहा, मग माझी काय स्वप्न आहेत... हे तुम्हाला दिसतील... रोजगाराच्या पलीकडे आमच्या युवकांना स्वप्न पडत नाहीत... पुढे काही दिसत नाही...' असं म्हणत राज ठाकरेंनी टाळ्या मिळवण्याचाही प्रयत्न केला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.