मुंबई: युतीसंदर्भातल्या प्रस्तावावरून भाजप आणि शिवसेनेत ‘पहले आप पहले आप’ सुरू झालंय. सत्तेमध्ये सहभागी होण्यास शिवसेना तयार आहे. मात्र भाजपकडून सन्मानजनक प्रस्तावाची वाट पाहत असल्याची प्रतिक्रिया युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी दिलीय.
याचसंदर्भात शिवसेनेची मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकिला सुभाष देसाई, रामदास कदम आणि संजय राऊत हजर होते. बैठकीनंतर भाजपाशी चर्चा सुरु असून उद्यापर्यंत वाट पाहा असं सूचक विधान खासदार संजय राऊत यांनी केलंय.
तर दुसरीकडे शिवसेनेला सरकारमध्ये सहभागी करून घेण्यास उत्सुक असल्याची प्रतिक्रिया भाजपनं दिलीय. मात्र शिवसेनेकडून कुठलाही प्रस्ताव आलेला नसल्याचं भाजपचे महाराष्ट्रातील निवडणूक प्रभारी ओम माथूर यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळं प्रस्तावावरून युतीचं घोडं अडलेलं असून पहिले प्रस्ताव कोण देणार याकडं लक्ष लागलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.