मोदींची पहिली सभा कोल्हापूरलाच का?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिला जाहीर सभा कोल्हापूरात होणार आहे. भाजपनं मोदींच्या पहिल्या सभेसाठी पश्चिम महाराष्ट्राची निवड करण्यामागची अनेक कारणं असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या शक्तीस्तळावर आघात करण्याचा मुख्य उद्देश आहे. 

Updated: Oct 1, 2014, 08:04 PM IST
मोदींची पहिली सभा कोल्हापूरलाच का?  title=

कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिला जाहीर सभा कोल्हापूरात होणार आहे. भाजपनं मोदींच्या पहिल्या सभेसाठी पश्चिम महाराष्ट्राची निवड करण्यामागची अनेक कारणं असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या शक्तीस्तळावर आघात करण्याचा मुख्य उद्देश आहे. 

पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा बालेकिल्ला... या बालेकिल्यानं नेहमीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला साथ दिली आहे. या दोन्हीही पक्षाची पश्चिम महाराष्ट्रात चांगली ताकद पाहायला मिळते. 

याचाच विचार करुन भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली जाहीर सभा पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरात ठेवली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या शक्तीस्थळावर हल्ला चढविण्याचा हेतूनं ही सभा आयोजित करण्यात आल्याचं राजकीय विश्लेषकाचं म्हणणं आहे. एवढंच नव्हे तर खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यामध्ये चांगली ताकद आहे. त्याचा फायदाही महायुतीच्या उमेदवारांना होणार आहे.

कोल्हापूर शहर हे रयतेचा राजा छत्रपती शाहू महाराज याचं आहे. अशा या शहराला करवीर निवासीनी श्री महालक्ष्मी मंदिरामुळं धार्मिक महत्व देखील मोठं आहे. त्यामुळंच काही दिवसांपूर्वीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेवून प्रचाराचा शुभारंभ केला होता. पश्चिम महाराष्ट्रात भाजपची ताकद कमी आहे, ती ताकद या निवडणुकीच्या निमित्तानं वाढावी हाही भाजपचा उद्देश दिसतोय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.