मुंबई : मुंबईत होणाऱ्या चुरशीच्या लढतीपैकी वरळी मतदारसंघ हा एक आहे. या मतदार संघामध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी मध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. या मतदार संघाचा घेतलेला हा आढावा.
मराठी, दलितबहुल मतदार संघ म्हणून वरळी मतदार संघाची ओळख आहे . या सोबतच उत्तर आणि दक्षिण भारतीय मतदारही मोठ्या प्रमाणात या मतदार संघामध्ये आहेत . यावेळी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सचिन आहिर यांच्यासमोर शिवसेना-भाजपचे कडव आव्हान असणार आहे. मात्र असं असलं तरी विकासाची केलेली कामे हे आपलं बलस्थान आहे , त्यामुळे विजय आपलाच होणार असा दावा सचिन आहिर यांनी केला आहे.
वरळी दुध डेरी आधुनिकीकरण , बीडीडी जुन्या चाळी आणि झोपडपट्ट्याचां पुनर्विकास, धोबिघाटचा प्रलंबित प्रश्न , वरळी कोळीवाड्याचा विकास , पोलिसांच्या घरचा प्रश्न या आणि इतर मुद्द्यांभोवती सध्या इथे प्रचार फिरतोय. शिवसेना आणि भाजप उमेदवारांनी याच मुद्द्यावर भर दिला आहे.
पूर्वी राष्ट्रवादीमध्ये असणारे मनसे उमेदवार विजय कुडतरकर हे राष्ट्रवादीची मते खेचू शकतात. याचा फटका काही प्रमाणात सचिन आहिर यांना बसू शकतो. परंतु भाजप आणि शिवसेना समोरासमोर असल्याने मतांच्या विभाजनामुळे तसेच काँग्रेसचा तुल्यबळ उमेदवार या विभागात नसल्यानं राष्ट्रवादीच्या घड्याळाचा पुन्हा या विभागामध्ये गजर होईल, अशी चर्चा जोरात आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.