रत्नागिरी : जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखणी गावात ११६ गावठी हातबॉम्बसह एकाला अटक करण्यात आली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केलीय. कुंभारखणी खुर्द भेलेवाडी येथील एका घरात गावठी हातबॉम्ब तयार करून रानटी प्राण्यांची शिकार केली जात असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आलं होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
या पथकाने भेलेवाडी येथील संजय गणपत कांबळे याच्या घरावर छापा टाकून ११६ गावठी हातबॉम्ब आणी ६५० ग्रम वजनाची पांढ-या रंगाची पावडर असा एकूण ६९ हजार सहाशे किंमतीचा बेकायदेशीर मुद्देमाल मिळून आला. दरम्यान, या प्रकरणाच्या प्राथमिक तपासामध्ये कोणत्याही दहशतवादी कृत्याचा उद्देश नसल्याचं निष्पन्न झाले.