मिरज: मिरजेत गॅस्ट्रोनं आणखी दोघांचा बळी घेतला असून गँस्ट्रोनं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता तेरावर पोहोचलीय. सांगली जिल्ह्यात गॅस्ट्रोचं थैमानस सुरु आहे आणखी वीस जणांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचं समोर येतंय.
दरम्यान सांगलीतल्या मिरजमध्ये गॅस्ट्रो या साथीच्या रोगाची लागण नेमकी कशामुळं झाली, याची चौकशी राज्य सरकारच्या आरोग्य विभागानं सुरू केलीय. आरोग्य विभागाच्या सह संचालक कांचन जगताप यांनी कालच मिरजमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
गॅस्ट्रोला आळा घालण्यासाठी सांगली मिरज कुपवाडा महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.