पुणे : राज्यात 2015 मध्ये दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांमध्ये 2014 च्या तुलनेत 9.97टक्के वाढ झाली आहे. असं असताना याच वर्षात खुनासह, दरोडे तसेच जबरी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये मात्र उल्लेखनीय घट झाली. त्याचवेळी महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात 16.57 टक्के इतकी वाढ नोंदवली गेली आहे.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या 'महाराष्ट्रातील गुन्हे - २०१५ ' या अहवालाचं पुण्यात प्रकाशन झालं. या अहवालात स्त्रियांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात वाढ नोंदवण्यात आली असली तरी त्या संदर्भातील कायद्यातील सुधारणा तसेच गुन्हे दाखल करण्याबाबत महिलांमध्ये घडून आलेली जागृती ही त्यामागील प्रमुख करणं असल्याचं सांगण्यात येत आहे.