एका मुलीनंतर शस्त्रक्रिया करणाऱ्या आईला २५ हजारांचं गिफ्ट!

 बातमी सावित्रीच्या लेकींसाठी…! पिंपरी चिंचवड महापालिकेनं मुलींसाठी खास योजना जाहीर केलीय. एका मुलीनंतर शस्त्रक्रिया करणाऱ्या आईच्या नावे महापालिका २५ हजारांची ठेव ठेवणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय.  

Updated: Jan 23, 2015, 08:34 PM IST
एका मुलीनंतर शस्त्रक्रिया करणाऱ्या आईला २५ हजारांचं गिफ्ट! title=

पुणे :  बातमी सावित्रीच्या लेकींसाठी…! पिंपरी चिंचवड महापालिकेनं मुलींसाठी खास योजना जाहीर केलीय. एका मुलीनंतर शस्त्रक्रिया करणाऱ्या आईच्या नावे महापालिका २५ हजारांची ठेव ठेवणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय.  

दोनच दिवसांपूर्वी एक अज्ञात महिला मुलीला जन्म देऊन तिला सोडून दिल्याची धक्कादायक घटना घडलीय. या घटनेनं आजही अनेकांना 'मुलगी नको' हे अधोरेखित झालंय. आजही स्त्री भ्रूण हत्या हा चिंतेचा विषय आहे. आधुनिक जीवन सरणी आत्मसात करूनही अनेकांना मुलगी नकोच आहे. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेत पिंपरी चिंचवड महापालिकेन एक पाऊल पुढ टाकलंय.

एका मुलीवर शस्त्रक्रीया करणाऱ्या आईच्या नावे महापालिका तब्बल २५ हजारांची ठेव ठेवणार आहे. मुलींच्या नावे ही २५ हजारांची ठेव ठेवली जाणार आहे. दोन मुलींवर शस्त्रक्रीया करणाऱ्या पालकांनाही १० हजार रुपये देण्यात आहेत, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष महेश लांडगे यांनी दिलीय. 

एव्हढंच नाही तर, महापालिकेन या पूर्वी अशी शस्त्रक्रिया करणाऱ्या सर्वांनाही हा लाभ देण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार एका मुलीवर शस्त्रक्रिया करणाऱ्या पाच महिला आणि मुलींना प्रत्येकी २५ हजार रुपये जाणार आहेत. तर दोन मुलींवर शस्त्रक्रीया केलेल्या १०३ पालकांना प्रत्येकी १० हजार रुपये देण्यात येणार आहेत. 

या योजना खरंच उपयुक्त असल्याची भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केलीय. मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेची ही योजना खरंच कौतुकास्पद आहे. याच पद्धतीनं इतर महापालिकांनी ही अशा योजना राबवल्या तर  मुलींचा जन्म खरंच सुकर होईल... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.