नाशिक : नामपूर बाजार समितीमध्ये साठवून ठेवलेल्या उन्हाळी कांद्याला चक्क 30 रुपये क्विंटल म्हणजे अवघा 3 पैसे किलो भाव मिळाला. तर दुसऱ्या एका शेतकऱ्याला कमी भाव कांदा मार्केट यार्डात फेकून दिला.
कमी भाव मिळाल्याने वाहतूक खर्च निघत नाही. कधी आडत व कधी नोटाबंदीच्या कारणावरून कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहिल्याचा फटका साठवून ठेवलेल्या उन्हाळी कांद्याला बसलाय. मोठ्या प्रमाणावर कांदा खराब झाला आहे.
काल नामपूर बाजार समितीमध्ये अंबासनच्या एका शेतकऱ्याला उन्हाळी कांद्याला 30 रुपये क्विंटल भाव मिळाला. त्याने 5 क्विंटल कांदे विक्रीसाठी आणले होते. हमाली, तोलाई आणि वाराई जाऊन त्यांच्या हातात केवळ 110 दहा रुपये पडले. तर चिराई येथील शेतकरी कमी भाव मिळाल्याने कांदा फेकून दिला.