नागपूर जेलमधून 'अब तक ५६' मोबाईल जप्त

Updated: Apr 8, 2015, 10:19 AM IST
नागपूर जेलमधून 'अब तक ५६' मोबाईल जप्त title=

नागपूर : नागपूरच्या सेंट्रल जेलमधून कैदी पलायन प्रकरणी आज अजून 10 अधिकारी, कर्मचा-यांना निलंबीत करण्यात आलंय.

आत्तापर्यंत निलंबीत झालेल्या कर्मचा-यांची संख्या 12 वर गेलीय. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी ही माहिती दिलीय.

तर कारागृहातून आज 6 मोबाईल, 4 पेनड्राईव्ह, 1 सीमकार्ड, 1 बॅटरी आणि 2 चार्जरही जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे जप्त मोबाईलची संख्या आता 56 वर पोहोचलीय. 

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना सर्व सुखसोयी मिळतात हे जगजाहीर झाल्यावर आता या सोई त्यांच्यापर्यंत कश्या पोहोचतात याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत.

पण आता या सोयी त्यांच्यापर्यंत या सोयी पोचतात कशा याचा व्हीडीओ आता झी मीडियाच्या हाती लागलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.