ठाणे : कल्याणच्या मुरारबाग येथे रहाणा-या नव्वद वर्षांच्या राधाबाईंना कळशीभर पाण्यासाठी आटापीटा करावा लागतोय. नियमीत पाणीपट्टी भरूनही राधाबाईंना पाणी मिळत नव्हतं. पुरेसं पाणी सोडावं यासाठी त्यांनी अनेकदा महापिलिका कर्मचा-यांकडे तक्रारी केल्या मात्र त्यांच्या तक्रारीची कुणीही दखल घेईना. अखेर वैतागून त्यांनी पाणीपट्टी भरणंच बंद केलं..
पाणीपट्टी न भरल्यामुळे मनपा प्रशासनाने राधाबाईंना ७ हजार ४७० रुपये पाणीपट्टी आणि ४ हजार ४७७ रुपये व्याज असं तब्बल १२ हजार ५४७ रुपयांचं बिल पाठवलं. हे बील न भरल्यामुळे पालिकेनं त्यांचं नळ कनेक्शन तोडण्याची तत्परता मात्र दाखवली.
१२ हजार रुपये भरण्यास तयार आहेत परंतु बिल भरल्यावर पाणी येईल का? असा प्रश्न राधाबाईंनी प्रशासनालाला विचारलाय.. मात्र त्यांच्या प्रश्नाचं उत्तर पालिकेकडे नाही.. त्यामुळे कळशीभर पाण्यासाठी राधाबाईंची वणवण कधी संपणार असा सवाल उपस्थीत होतो.