मुंबई: अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन घोषणाबाजी केली. पण कर्जमाफीबाबत अर्थमंत्र्यांनी कोणतीच घोषणा केली नाही. पण दुष्काळग्रस्तांसाठी 5282 कोटींची तरतुद करण्यात आली आहे.
कृषी क्षेत्रासाठी २५ हजार कोटींची तरतूद
सिंचनासाठी ७८५० कोटी
जलसिंचनाचे २८ प्रकल्प पूर्ण करणार
१ लाख हेक्ट सिंचन क्षमता निर्माण होणार
प्रकल्पांसाठी २५ टक्के अनुदान देणार
दुष्काळग्रस्तांसाठी ५२८२ कोटींची तरतूद
१८८५ कोटी पिक विमा योजनेसाठी
शेतरस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 'पालकमंत्री योजना'
पिक वाचवण्यासाठी दोन हजार कोटी
राज्यात प्रत्येक जिल्ह्यात कृषी महोत्सव
युवकांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार
कृषीप्रक्रिया उद्योगासाठी अनुदान देणार
दोन नवी पशू वैद्यकीय महाविद्यालय उभारणार
मराठवाडा, विदर्भात शेतकऱ्यांना वीज सवलत
साखर उद्योगाला ऊस खरेदी कर माफ