'अजितदादांची जागा येरवडा तुरुंगात'

राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्यावर आणखी एका गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे.

Updated: Feb 8, 2016, 03:36 PM IST
'अजितदादांची जागा येरवडा तुरुंगात' title=

लोणावळा: राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्यावर आणखी एका गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी खुद्द राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी हा आरोप केला आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या 3 महिने आधी अर्थमंत्री या नात्यानं अजित पवार यांनी 300 कोटी रुपये महामंडळाला दिले. त्याचा हिशेब लागत नाही. हे ३०० कोटी रुपये निवडणूकमध्ये ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार होते त्या ठिकाणी वाटण्यात आले. हा हिशोब माझ्याकडे आहे, असा आरोप दिलीप कांबळेंनी केला आहे.

 

अजित पवार पुढच्या काळात तुमची जागा येरवडा जेलमध्ये आहे, असंही कांबळे म्हणाले आहेत. लोणावळा नगरपरिषदेच्या विकास कामांचं उद्घाटन आणि भूमीपूजन सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केलं त्यावेळी त्यांनी अजित पवारांवर हे खळबळजनक आरोप केले आहेत.