साकेत एक्सप्रेसध्ये टीटीआयवर चोरट्याकडून चाकूनं हल्ला

शालीमार लोकमान्य टिळक टर्मिनस साकेत एक्सप्रेसमध्ये लुटमारी साठी आलेल्या चोरट्याला विरोध केल्यानं भुसावळ इथल्या तिकीट निरीक्षक चुन्नीलाल गुप्ता यांच्यावर चाकूनं जीवघेणा हल्ला झालाय.

Updated: Mar 26, 2015, 12:04 PM IST
साकेत एक्सप्रेसध्ये टीटीआयवर चोरट्याकडून चाकूनं हल्ला title=

भुसावळ: शालीमार लोकमान्य टिळक टर्मिनस साकेत एक्सप्रेसमध्ये लुटमारी साठी आलेल्या चोरट्याला विरोध केल्यानं भुसावळ इथल्या तिकीट निरीक्षक चुन्नीलाल गुप्ता यांच्यावर चाकूनं जीवघेणा हल्ला झालाय.

या हल्ल्यात गुप्ता यांचा गळा कापला गेल्यानं ते गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर इगतपुरी इथं प्राथमिक उपचार करून नाशिकला हलविण्यात आलंय. 

इगतपुरी ते नाशिक दरम्यान ही घटना घडली असून यावेळी गाडीत रेल्वे सुरक्षा बल तसंच रेल्वे पोलीस तैनात नसल्याचा आरोप होतोय अपुऱ्या सुरक्षेमुळं ही घटना घडलीय असाही आरोप होतोय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.