औरंगाबाद: औरंगाबाद महापालिकेच्या महापौरपदाचा तिढा सुटलाय.. महापौरपदाबाबात शिवसेना आणि भाजपमध्ये एकमत झालंय. महापौरपद चार वर्ष शिवसेनेकडे आणि एक वर्ष भाजपकडे राहणार आहे.
सुरुवातीचे एक वर्ष महापौरपद शिवसेनेकडे, त्यानंतर एक वर्ष भाजपकडे आणि अखेरची अडीच वर्ष महापौरपद पुन्हा शिवसेनेकडे असणार आहे. तर स्थायी समिती अध्यक्षपद सुरुवातीची तीन वर्ष भाजपकडे आणि उरलेली दोन वर्ष शिवसेनेक़डे असणार आहे.
शिवसेना नेते रामदास कदम आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यात झालेल्या बैठकीत याबाबत एकमत झालंय. यापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये फॉर्म्युल्यावर एकमत झालं नव्हतं. त्यामुळं हा तिढा कायम होता. नवी मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाल्यानंतर मात्र हा युतीचा निर्णयही झालाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.