नवी मुंबई: नवी मुंबईत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करण्याचा निर्णय दोन्ही काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी घेतलाय. या निर्णयामुळे पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर करण्याचा मार्ग मोकळा झाला असून पाच अपक्षांच्या घोडेबाजाराला लगाम बसलाय.
काँग्रेसच्या दहा नगरसेवकांपैकी दोघांना पाच वर्षांत उपमहापौर पद आणि आठ जणांना विषय समित्यांचे सभापती पद देण्याचे ठरलंय. निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं अपक्षांवर अवलंबून राहण्याची वेळ आली होती. त्रिशंकू असलेल्या या स्थितीत पाच अपक्षांचा भाव वधारला होता.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने पाच अपक्षांचं पाठबळ असताना काँग्रेस बरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला. त्यांना पाच वर्षांतील उपमहापौर पद आणि आठ नगरसेवकांना एक वर्षांचे विषय समित्यांचे सभापती पद देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेतील संख्याबळ राष्ट्रवादीचे ५२ आणि काँग्रेसचे १० असे आघाडीचे ६२ झाले असून अपक्षाचे पाच नगरसेवकही आघाडीबरोबर राहणार आहेत. त्यामुळे ही संख्या ६७ होत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.