औरंगाबाद : महापालिकेतील शिवसेना भाजपचा १५ वर्षांचा संसार संपुष्टात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
औरंगाबादेत शिवसेना भाजपमध्ये जागावाटपासाठी ६ वेळा बैठका झाल्या. मात्र तोडगा मात्र निघाला नाही त्यात काही वार्डांवरून युतीचं घोडं अजूनही अडकलेलंच आहे. त्यामुळं आता फक्त काहीच दिवस उरले असताना युती होणारच नाही असे चित्र निर्माण झालय.
नवी मुंबई महापालिकेत शिवसेना भाजपला जागा सोडण्यास तयार नाही अशा अवस्थेत तिथं य़ुती होणार नसेल तर औरंगाबादेतही युती हवीच कशाला असा प्रश्न भाजप नेत्यांचा पडलाय.
या सगळ्यातून आता दोन्ही पक्षातील नेत्यांनी वेगवेगळं लढण्याची मानसिकता पूर्ण झाली असल्यानं जणू आता युती होणार नाही अशी घोषणाच करणं बाकी असल्याचं सांगण्यात येतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.