मुंबई : ठाणे जिल्ह्यातील पाच शहरांना भातसा धरणातून पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. एकूण ५० एमएलडी पाणी पाच शहरांना देण्यात येणार आहे.
ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी आणि आंध्र धरणाचा पाणीसाठा कमालीचा घटलाय. त्यामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर या महापालिकांनी मोठ्या प्रमाणात पाणीकपात जाहीर केलीय.
या शहरात पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी अखेर या पाच शहरांना भातसा धरणातून पाणी देण्य़ाचा निर्णय घेण्यात आलाय.
शहरात सुरू असलेली पाणीटंचाई लक्षात घेता ही तात्पुरती व्यवस्था आहे. कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी काळू धरण लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे अशी माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय.