अंबरनाथ : भाजप कामगार संघटना आता आपल्याच सरकारच्या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरणार आहेत.
रक्षा उत्पादन आयुध निर्माण कारखान्यांमध्ये खाजगी कारखान्यांना आणि विदेशी गुंतवणूकीला परवानगी देणं या सरकारच्या धोरणाविरोधात भाजपप्रणित कामगार संघटनेने विरोध केलेला आहे.
या विरोधामुळे, आज अंबरनाथ येथील आयुध निर्माण कारखान्याबाहेर प्रतिक्षा मजदूर संघ या भाजपप्रणीत संघटनेने घोषणाबाजी केली. तसंच, या खासगीकरणाच्या नितीच्या विरोधात 5 डिसेंबर ते 9 डिसेंबर या काळात देशव्यापी आंदोलनाची घोषणा देखील करण्यात आली आहे.