पालघर येथे बोगस क्राईम ब्रॅंच अधिकाऱ्यांना अटक

क्राईम ब्रँचचे अधिकार असल्याचं भासवून हजारो रुपये लुटणाऱ्यांना पालघर पोलिसांनी अटक केली आहे. 

Updated: Apr 25, 2015, 04:48 PM IST
पालघर येथे बोगस क्राईम ब्रॅंच अधिकाऱ्यांना अटक title=

पालघर : क्राईम ब्रँचचे अधिकार असल्याचं भासवून हजारो रुपये लुटणाऱ्यांना पालघर पोलिसांनी अटक केली आहे. 

पालघर जिल्ह्यातल्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी इथे, मदनकुमार वर्मा यांना चौघा वाहतूक पोलिसांनी हटकलं. क्राईम ब्रँचचे अधिकारी असल्याचं सांगत, चौघांनी त्यांना जबर मारहाण केली. नंतर वसईतल्या एटीएममध्ये नेऊन, तिथून या चौघांनी त्यांच्याकडून पंचवीस हजार रुपये काढून घेतले होते.

या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर, पोलिसांनी या चौघांना अटक केली. वसई वाहतूक विभागात ते सेवेत असल्याचं उघड झालंय. राजू चव्हाण, सुरेश रतन राठोड, राजू नसीर शेख आणि जितेंद्र भीमराव चौगुले, अशी त्यांची नावं आहेत. या चौघांनाही निलंबित करण्यात आलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.