डोंबिवली: रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला डोंबिवलीच्या पाटीलवाडी परिसरातल्या चार मजली इमारतीच्या पिलरला तडे गेल्याचं आढळलं.
दुपारी साडेतीनच्या सुमारास हे तडे अधिक धोकादायक झाल्याची माहिती इथं राहणाऱ्या रहिवाशांनी अग्निशमन दलाला दिली.. याबाबत माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आपत्कालीन पथकानं घटनास्थळी धाव घेतली.
या इमारतीतील ४८ कुटुंबियांना सुखरुप सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. लेखापरीक्षणानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.