राज्यपाल भरकटले... तेलंगणात पोहचले!

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचं हेलिकॉप्टर आज दुपारी अचानक भरकटल्यानं काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

Updated: May 29, 2015, 06:29 PM IST
राज्यपाल भरकटले... तेलंगणात पोहचले! title=

नांदेड : राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचं हेलिकॉप्टर आज दुपारी अचानक भरकटल्यानं काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागाला भेट देण्यासाठी राज्यपाल निघाले असताना, हा प्रकार घडला. त्यांचं हेलिकॉप्टर भरकटून तेलंगणात गेलं. 

तब्बल २५ मिनिटांनंतर अखेर ते हेलिकॉप्टर सुखरूप नियोजितस्थळी पोहोचलं. पायलटच्या समयसूचकतेमुळं मोठा अनर्थ टळला. 

दरम्यान, थोडक्यात बचावल्याची कबुली खुद्द राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिली.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.