ठाण्यात दोन लहान भावंडांना कारने उडवले

वाहन चालवताना जर आपण नियंत्रण गमावले तर काय होऊ शकते, याचा अनुभव ठाण्यात आलाय. एका खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने अचानक लहान मुले समोर आल्यावर ब्रेक दाबाण्याऐवजी एक्सलेटर दाबला आणि हा धक्कादायक अपघात घडलाय.

Updated: Nov 27, 2016, 01:57 PM IST

ठाणे : वाहन चालवताना जर आपण नियंत्रण गमावले तर काय होऊ शकते, याचा अनुभव ठाण्यात आलाय. एका खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने अचानक लहान मुले समोर आल्यावर ब्रेक दाबाण्याऐवजी एक्सलेटर दाबला आणि हा धक्कादायक अपघात घडलाय.

या अपघातात दोन लहान भावंडे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातानंतर नौपाडा पोलिसांनी आरोपी वाहन चालकाला अटक केली आहे, त्याची गाडी देखील जप्त केलीय, या सर्व प्रकारचे cctv फुटेज मन सुन्न करणारे आहे.