मुख्यमंत्री फडणवीस आजपासून दुष्काळ दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. यंदा दुष्काळानं महाराष्ट्राला अक्षरशः पिळवटून काढलं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरुच आहेत. या पार्श्वभूमीवर परिस्थितीची प्रत्यक्ष शेतावर जाऊन मुख्यमंत्री आजपासून पाहणी दौरा करणार आहेत. 

Updated: Sep 1, 2015, 03:24 PM IST
मुख्यमंत्री फडणवीस आजपासून दुष्काळ दौऱ्यावर title=

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. यंदा दुष्काळानं महाराष्ट्राला अक्षरशः पिळवटून काढलं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरुच आहेत. या पार्श्वभूमीवर परिस्थितीची प्रत्यक्ष शेतावर जाऊन मुख्यमंत्री आजपासून पाहणी दौरा करणार आहेत. 

अधिक वाचा - सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्याला २ दिवस सुटी मिळणार?

शेतकऱ्यांच्या पाठिशी राज्य सरकार आहे. गरज पडल्यास कर्जही काढू अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिली आहे.

अधिक वाचा - राज्यातील विहिरींची होणार मोजणी

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्षात काही मिळणार आहे का? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. याआधी एक एप्रिल रोजी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी हेक्टरी पंचवीस हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा केली होती. त्याचीही आठवण यावेळी अशोक चव्हाण यांनी करुन दिली. 

असा असेल मुख्यमंत्र्यांचा दुष्काळ दौरा... 
1 सप्टेंबर 2015
- दुपारी लातूर जिल्ह्याची आढावा बैठक
- शिरूर अनंतपाळ, निलंगा आणि औसा तालुक्यातील गावांना भेटी
- पीक परिस्थितीची पाहणी करतील आणि चारा छावणी-वनीकरण क्षेत्राला भेट
- रात्री उस्मानाबादमध्ये जिल्हा आढावा बैठक घेणार

2 सप्टेंबर 2015
- उस्मानाबादमधील भूम आणि परांडा तालुक्यांतील पीक परिस्थितीचा आढावा
- जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या कामांचीही पाहणी
- बीडमधील पाटोदा तालुक्यात टंचाई निवारणासाठी उपाययोजनांची पाहणी
- फळबागा लागवडीच्या कामांनाही भेट देणार
- सायंकाळी बीडमध्ये जिल्हा आढावा बैठकीत उपाययोजनांबाबत माहिती घेणार

3 सप्टेंबर 2015
- परभणीतील पाथरी, मानवत, गंगाखेड, पालममध्ये पीक परिस्थितीची पाहणी
- जलयुक्त शिवार योजनेची कामे, चारा छावण्या आदींची पाहणी
- दुपारी परभणीमध्ये जिल्हा आढावा बैठक
- सायंकाळी नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील गावांना भेट
- टंचाई निवारणार्थ उपाययोजनांची मुख्यमंत्री माहिती घेणार

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.