लातूर: राज्याच्या मंत्रिमंडळानं मराठवाड्यातल्या दुष्काळी भागाचा दौरा केला. या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
मराठवाड्यामध्ये चारा छावण्यांसाठी आणखी 50 कोटी रुपये देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसंच मराठवाड्याच्या दुष्काळ निवारणासाठी 500 कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
याबरोबरच विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क अजूनही कमी करण्याचा विचार असल्याचं सांगत, मदतीपासून कुणीही वंचित राहणार नसल्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं.
मराठवाड्यातला मंत्र्यांचा दौरा संपलाय. या दौ-यानंतर मुख्यमंत्र्यांनी विभागीय आढावा बैठक घेतली. दौ-यातील अनेक मंत्री बैठकीला उपस्थित होते.