नांदेड : भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी शिवसेनेसोबत जायला काँग्रेसचा विरोध नाही असे सूचक संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिलेत.
जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाची ही भूमिका स्पष्ट केली. जिथे भाजपाला रोखता येणं शक्य आहे तिथे तसे पूर्ण प्रयत्न सुरु असल्याचं, अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीशी आघाडी करण्याबाबतचे प्रयत्न सुरु असल्याचं ते म्हणाले. तर बीडमध्येही काही स्थानिक प्रश्न आहेत, मात्र आघाडीबाबत प्रयत्न सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.