कर्जत : नवीन पोलीस स्टेशन हवे असतील तर आपल्याला क्राईम रेट वाढवायचं काम हाती घ्यावं लागेल, असा अजब सल्ला गृहराज्यमंत्री राम शिंदेंनी दिला आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस स्टेशनच्या उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते. क्राईम रेट जर कमी असेल तर नवीन पोलीस स्टेशन मंजूर करता येत नाहीत, अशी माहिती देऊन आपण एक वर्ष गृहराज्यमंत्री असल्याने आपल्याला सर्व बाबी माहिती आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड यांनी तालुक्यात सिद्धटेक आणि कुळधरण इथं नवीन पोलीस स्टेशन सुरु करण्याची मागणी केली होती. या नवीन पोलिस स्टेशनच्या उद्घाटन प्रसंगी राम शिंदे यांनी हा अजब सल्ला दिलाय.