यवतमाळ : जिल्ह्यात हैदराबादच्या तीन संशयीत युवकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ६० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आलीत आहेत.
मोहम्मद मयुद्दीन ओवेसी, उमर मोहम्मद गाजी, आणि मोहम्मद मिसबाओद्दीन अशी या तिघांची नावं आहेत. विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर दराटी पोलिस स्टेशनच्या हद्दीत खराबी चेक पोस्ट नाक्यावर रात्रीच्या गस्तीवेळी ही करावाई करण्यात आली.
जप्त केलेल्या काडतुसांमध्ये ०.२२mm बोअरच्या ५० राऊंड तसेच ०.३० बोअरची १० काडतूसं आहे. या तीनही तरुणांवर आर्मस्ट अॅक्ट नुसार कारवाई करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना ५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
यापूर्वी पुसद आणि उमेरखेडतील काही तरुणांचा दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचं पुढे आलं होतं. त्यामुळे या तिघांचाही एटीएसकडून तपास सरु आहे.