शनीशिंगणापूर : शनीशिंगणापूरच्या चौथऱ्यावरील महिला प्रवेशाचा वाद आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेला आहे.
महिला प्रवेशासंदर्भात जिल्हाधिकारी कार्लायलयात समन्वय बैठक घेण्यात आली. पण या बैठकीत कोणताच निर्णय होऊ शकला नाही. अहमदनगरचे तहसीलदार, मंदिराचे विश्वस्त आणि कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनीही या बैठकीला हजेरी लावली.
400 वर्षांची ही परंपरा मोडणं अशक्य असल्याचं विश्वस्तांचं म्हणण आहे, त्यामुळे या वादावर आता मुख्यमंत्री निर्णय घेतील. याबाबत मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, अशी प्रतिक्रिया तृप्ती देसाई यांनी दिली आहे.