नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्या अधिवेशनाला आज नागपुरात सुरूवात होत आहे. हिवाळी अधिवेशनात या नव्या सरकारला अनेक मोठ्या मुद्यांचा सामना करावा लागणार आहे.
पंधरा वर्षानंतर भाजप-शिवसेना सत्तेत आल्यानंतर दुष्काळाचा प्रश्न हाताळावा लागणार आहे, काँग्रेस आज पहिल्याच दिवशी मोर्चा काढणार आहे. पहिल्या दिवसापासून काँग्रेसची आक्रमक भूमिका दिसून आली आहे.
नेहमीच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळातील मदत, कापूस आणि उसाचे भाव यावर रणकंदन माजवणाऱ्यांना आता सत्तेत बसून याच विषयावर न्याय द्यावा लागणार आहे.
कापसाचे भाव मागील वर्षाच्या तुलनेत खाली आल्याने विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.