अलिबाग : रायगड जिल्ह्यात महाकाय व्हेल माशाच्या मृत्यूनंतर डाल्फीनला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. जिल्ह्यात नागोठण्याजवळ अंबा नदीत चक्क डॉल्फ़िन मासा दिसला. डॉल्फ़िन आणि त्याच्या कसरती पाहण्यासाठी तिथं लोकांनी एकच गर्दी केली.
बुधवारी दुपारी एका मच्छीमारानं या डॉल्फ़िनला पाहिलं. साधारणतः खाऱ्या पाण्यात आढळणारा डॉल्फ़िन नदीमध्ये कसा आला, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय. त्यानंतर संध्याकाळी वनखात्याचे कर्मचारी नागोठण्यात दाखल झाले. त्यांनी संध्याकाळी उशीरा या डॉल्फिनला समुद्रात सुखरूपपणे सोडलं.
समुद्राच्या भरतीच्या प्रवाहात एक डॉल्फीन नागोठण्याच्या अंबा नदीत आल्याने प्रशासनाची झोप ऊडाली आहे. वन खाते, नौदल आणि स्थानिक प्राणीमित्रांच्या सहयोगाने रात्री त्या डॉल्फीनला वाचविण्यासाठी प्रयत्न केले गेलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.