घुमान साहित्य संमेलन फक्त 2,29,43,500 रुपयांत!

घुमान इथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा जमाखर्च अखेर जाहीर करण्यात आलाय. जमाखर्चाचा आकडा पाहता मराठी साहित्य संमेलननने कोटींची उड्डाणं घेतल्याचं पाहायला मिळतंय. 

Updated: May 7, 2015, 09:07 PM IST
घुमान साहित्य संमेलन फक्त 2,29,43,500 रुपयांत! title=

पुणे : घुमान इथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा जमाखर्च अखेर जाहीर करण्यात आलाय. जमाखर्चाचा आकडा पाहता मराठी साहित्य संमेलननने कोटींची उड्डाणं घेतल्याचं पाहायला मिळतंय. 

पंजाब इथे संत नामदेवांच्या कर्मभूमीत घुमान इथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं. साहित्यापेक्षा वादाचंच जास्त ठरलेल्या या साहित्य संमेलनाचा हिशेब अखेर मांडण्यात आलाय. अ़डीच कोटींचा खर्च या साहित्य संमेलनासाठी आलेला पाहिल्यावर मराठी साहित्याच्या इव्हेंटनेही कोटी कोटींची भरारी घेतल्याचं दिसतंय.

साहित्य संमेलनाचा अवाढव्य खर्च...

  • या संमेलनाचा एकूण खर्च आहे... केवळ 2 कोटी 29 लाख 43 हजार 500 रुपये... 

  • साहित्य प्रेमींसाठी मनस्ताप ठरलेल्या घुमानसाठीच्या रेल्वे प्रवासासाठी सर्वाधिक म्हणजे 77 लाख 53 हजार 46 रूपये खर्च झालाय. 

  • जेवणावळी आणि पाण्यासाठी 52 लाख 31 हजार 624 रूपये खर्च झाले आहेत

  • राहण्यासाठी 13 लाख 53 हजार 880 रूपये खर्च करण्यात आलेत

  • तर, स्टेजच्या सजावटीवर 13 लाख 41 हजार 322 रूपयांचा खर्च झालाय. 

या संमेलनासाठी राज्य सरकारकडून 25 लाखांचा निधी मिळाला होता तर वर्गणीतून 49 लाख 52 हजार 500 रूपये जमा झाले होते. तरीही स्वागताध्यक्ष असलेल्या भारत देसडला यांना 1 कोटी 39 लाख 66 हजार रूपये आणि संजय नहार यांना 15 लाख 25 हजारांची मोठी रक्कम आपल्या खिशातून भरावी लागली.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी झालेला हा अवाढव्य खर्च पाहता आता संमेलनं चांगलीच महागडी झाल्याचं दिसून येतंय. अर्थात, एवढा खर्च झाला तरी त्याचा मराठी साहित्या कितीसा हातभार लागला हा प्रश्न उरतोच...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.